वागणं

कितीही दिलं देवाने
तरी चुकत नाही मागणं
चुकता मात्र कधी कधी
आपला इतरांशी वागणं

चुकला आपला कितीही जरी
आपल्याला कळत नाही
समोरच्याला विचारतो आपण,
“कळत नाही का काही?”.

माणूस चुकतो आणि
माणसाने समजून घ्यावे
दिले नाही एकमेकांना काही
तरी प्रेम भरभरून दयावे…

About

A HR professional with various hobbies and interests.

Posted in Poems

Leave a comment